Aarya Ambekar Instagram – #SRGMPepisode01
नमस्कार…🙏🏻
आजपासून सारेगमप लिटिल चॅम्पस् चं नवीन पर्व सुरू होतंय. त्या निमित्त ही पोस्ट.
आपणा सर्वांना माहितच आहे, १२ वर्षांपूर्वी झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्पस् मध्ये मी एक स्पर्धक होते.
ह्याच स्पर्धेमुळे मी “संगीत” हे करिअर म्हणून निवडलं.
माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली. आणि आजही मी ह्याच मार्गावरून पुढे जात, संगीत क्षेत्रात काहीतरी विशेष करून दाखविण्याचं ध्येय बाळगून आहे.
१२ वर्षानंतरही झी मराठी आणि लिटिल चॅम्प्स ह्यांना माझ्या हृदयात तेच अढळ स्थान आहे.
मात्र यावेळी माझी भूमिका बदलली आहे.
ह्या बदललेल्या भूमिकेत छोट्या स्पर्धकांची मैत्रीण, त्यांची एक मार्गदर्शक, त्यांची ताई म्हणून काम करायला मला खूप आनंद होतोय!!
आजपर्यंत स्पर्धक म्हणून असो, गायिका असो, अभिनेत्री असो, तुम्ही माझ्या कलेला प्रेमाने स्वीकारलंत, माझ्या पाठीशी उभे राहिलात, पुन्हा पुन्हा मला प्रोत्साहन दिलंत.
ह्या नव्या भूमिकेसाठीही आपल्या सदिच्छा, आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील अशी आशा करते.
झी मराठी लिटिल चॅम्पस् चं हे नवीन पर्व पाहायला विसरू नका.
गुरुवार ते शनिवारी रात्री ९.३० वाजता.
.
Outfits – @aanviindia
Styled by – @bhosale.shradha2504
Assisted by – @the_pallavisingari
PC – Sanjay Mandhre
.
.
.
____
#aaryaambekar #zeemarathi #srgmplilchamps #zmlilchamps #juries #mentors #newrole #keepblessing #love ❤️ #aaryabani😁 | Posted on 24/Jun/2021 09:47:02