Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 16/Aug/2021 14:34:36

Navaneet Kaur Instagram –
Navaneet Kaur Instagram – केंद्रीय वने(फॉरेस्ट)पर्यावरण, कामगार कल्याण व रोजगार मंत्रो श्री भुपेंद्र यादव यांची खासदार सौ नवणीत रवी राणा यांनी भेट घेऊन केल्या विविध मागण्या
विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथील निर्माणाधिन स्कायवॉक वनविभाग व टायगर प्रोजेक्ट व पर्यावरण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी अडकले  असून यात केंद्रीय मंत्र्यानी तातडीने लक्ष घालून आडकाठी दूर करावी -खासदार सौ नवनीत रवी राणा यांची मागणी
अमरावती शहरातील श्रमजीवी नागरिकांची वस्ती असलेल्या संजय गांधी नगर क्र1,संजय गांधी नगर क्र.2,पंचशील नगर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून रहात असलेल्या नागरिकांना वनविभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे मालकी हक्क मिळत नसल्याने केंद्रीय मंत्र्यांनी जातीने लक्ष घालून पर्यवरण व वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे जेणेकरून या नागरिकांना जागेचे मालकी हक्क,पी आर कार्ड मिळेल-खासदार सौ नवणीत रवी राणा यांची मागणी
ताडोबा अभयारण्य च्या धर्तीवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा विकास करून पर्यटनाला चालना देण्यासाठी 500 कोटी ची मागणी
मेळघाटातील वनविभागाच्या सर्व विश्रामगृहांचे नूतनीकरण करून पर्यटकाना चांगल्या निवासव्यवस्था उपलब्ध व्हाव्या-खासदार सौ नवनीत रवी राणा यांची मागणी
अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार कल्याण मंडळाची सुसज्ज इमारत व्हावी ज्यात सांस्कृतिक भवन,वाचनालय, व्यायामशाळा,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,महिला रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र,आदी सुविधा असाव्यात, यासाठी प्रत्येक तालुक्यात कामगार कल्याण भवन निर्मितीसाठी तालुकानिहाय 5 कोटी रुपये देण्याची खासदार सौ नवनीत रवी राणा यांची कामगार कल्याण मंत्री भुपेंद्र यादव यांचेकडे आग्रही मागणी
 अमरवती पंचतारांकित एमआयडीसी मध्ये काम करणारे कामगार,तसेच बांधकाम व इतर  क्षेत्रात काम करणारे कुशल अकुशल,असंघटित कामगार यांच्या कल्याणार्थ केंद्र शासनाच्या विविध योजना प्रभावीणपणे राबविण्यात याव्या,ज्या आस्थापना, उद्योजक किंवा व्यावसायिक  कामगार कल्याणाकडे दुर्लक्ष करतात त्यांचेवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी सुध्दा खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय मंत्री भुपेंद्रजी यादव यांचेकडे केली.
 चिखलदरा येथील वन विभाग व टायगर प्रोजेक्ट च्या हरकतीमुळे खडलेला स्कायवॉक निर्मितीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे असून केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री भुपेंद्र यादव यांनी यात जातीने लक्ष घालण्याचे अभिवचन दिल्याने आता लवकरच स्काय वॉक चे उर्वरित निर्माण कार्य सुरू होऊन चिखलदऱ्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल असे मत खासदार सौ नवनीत रवी  राणा यांनी यावेळी व्यक्त केले.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur