Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 10/Aug/2021 18:52:59

Navaneet Kaur Instagram – महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात जवळपास 800 कोटींचा महाघोटाळ्याची सखोल चौकशी करा-खासदार सौ नवनीत रवि राणा यांची केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांना प्रत्यक्ष भेटून मागणी
महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदिवासी शिशुना शासनातर्फे देण्यात येणारा पौष्टिक आहार व अन्य जरुरी वस्तू न मिळाल्यामुळे गेल्या 2/3 महिन्यात मेळघाटात 49 नवजात शिशुचा मृत्यू_खासदार सौ नवनीत रवी राणा यांची केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्री स्मृती इराणी यांचेकडे तक्रार
  मा.उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्ट केलेल्या व महिला बालकल्याण विभागात पुरवठा किंवा कंत्राट घेण्यास मनाई केलेल्या समृद्धी व व्यंकटेश या कपन्यांना पळवाट शोधून ,मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करून कंझुमर फेडरेशन च्या माध्यमातून पुरवठा करण्याचे काम दिले गेले.-खासदार सौ नवनीत रवी राणा
राज्याच्या महिला व बालकल्याण विकासमंत्री श्रीमती यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा आहेत व त्यांच्याच गृह जिल्ह्यात इतक्या बालकांचा कुपोषणाने मृत्यू होणे ही गोष्ट अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी आहे-खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना केले अवगत
कंझुमर फेडरेशन मार्फत देण्यात आलेल्या या पुरवठा कंत्राटात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून पालकमंत्री यशोमती ठाकूर या प्रथमदर्शनी दोषी असल्याचे खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्या लक्षात आणून दिले व या योजनेत केंद्र शासन आणि राज्य शासन यांचा प्रत्येकी 50% रकमेचा निधी समाविष्ट असतो आणि एकप्रकारे ही केंद्र शासनाची फसवणूक असून यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जातीने लक्ष घालावे व  या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरपणे कार्यवाही करावी अशी मागणी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी यावेळी केली.
 मेळघाटातील अशिक्षित आदिवासी महिलांची फसवणूक एका महिला पालकमंत्री व महिला बालविकास कॅबिनेट मंत्र्यांच्या विभागात व गृह जिल्ह्यात होऊनही स्वतः महिला असणाऱ्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी याची साधी दखलही न घेणे म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी देणे होय किंवा यांचा त्यात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे मत खासदार सौ नवनीत रवी राणा  यांनी यावेळी स्मृती इराणी यांचेकडे केले.
Navaneet Kaur Instagram – माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांचे सोबत आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांची एक तास चर्चा,महाराष्ट्रातील सध्याची  राजकीय परिस्थिती,विविध सामाजिक प्रश्न आदी अनुषंगाने साधक-बाधक चर्चा झाली.विशेष म्हणजे श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आजच्या दिल्लीतील व्यस्त दौऱ्यात आमदार रवी राणा पूर्णवेळ त्यांचेसोबत उपस्थित होते.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur