Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 27/Jul/2021 16:54:21

Navaneet Kaur Instagram – केंद्रीय कृषी मंत्री श्री नरेंद्रजी तोमर यांच्यापुढे खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी मांडली,अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेल्या महाराष्ट्राची व्यथा
ढगफुटी व अतिवृष्टीमुळे, दरडकोसल्यामुळे, महाराष्ट्रात व अमरावती जिल्हात शेती,पशुधन व घरांचे प्रंचड नुकसान,अनेक नागरिक मृत्युमुखी पडले, अनेकांचे संसार उध्वस्त झाले.तातडीने पंचनामे करून केंद्रातर्फे भरीव सहकार्य करावे -खासदार सौ नवनीत रवी राणा यांची केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्रजी तोमर यांचेकडे मागणी
 अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मध्ये असणाऱ्या आदिवासींना  कृषी  विज्ञान केंद्रामार्फत  तांत्रिक कृषी  विषयक प्रशिक्षण देण्यात यावे /आदिवासींसाठी धारणी येथे विशेष कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात येणार -खासदार सौ नवनीत रवी राणा 
  रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक व कमी शेती असलेल्या शेतकऱयांचा समावेश करून त्यांना रोजगार मिळावा-खासदार सौ नवनित रवी राणा यांची मागणी
नवी दिल्ली- खासदार सौ नवनीत रवि राणा यांनी ढगफुटी व अतिवृष्टीने नुकसानग्रस्त अमरावती जिल्ह्याचा दौरा केला होता. हा दौरा करून खासदार सौ नवनीत रवि राणा व आमदार रवी राणा हे दिल्ली गेले  व तात्काळ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रजी तोमर यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील अतिवृष्टीने झालेल्या  भयावह व दुर्दैवी परिस्थितीची जाणीव करून दिली. या ढगफुटी व अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले आहे,जनजीवन विस्कळीत झाले असून,अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत,अनेक व्यक्ती वाहून गेल्या, जनावरे वाहून गेली, राज्यसरकार सध्याची परिस्थिती हाताळण्यास कमी पडत असून केंद्राने यात जातीने लक्ष घालावे व महाराष्ट्रातील ही भयावह परिस्थितीत जनतेला दिलासा द्यावा,या नैसर्गिक आपत्तीतुन जनतेला सावरण्यास मदत करावी अशी मागणी केली.
 सोबतच ज्यांची गुरेढोरे वाहून गेली अश्या पशुधन मालकांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी,ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे परंतु पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास  टाळाटाळ करीत आहेत अश्या पीकविमा कंपन्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार श्री रवी राणा यांनी यावेळी केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्रजी तोमर यांचेकडे केली.
 केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रजी तोमर यांनी खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेऊन निराकरण करण्याचे सकारात्मक अभिवचन दिले.
Navaneet Kaur Instagram –

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur