Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 12/Sep/2021 17:44:06

Navaneet Kaur Instagram – अमरावती शहर , बडनेरा, तसेच ग्रामीण क्षेत्रात प्रत्येक घरी जाऊन घेतले महालक्ष्मी आणि गौरी मातेचे दर्शन,संपूर्ण जगातून कोरोना हद्दपार व्हावा, अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या घरी सुख समृद्धी नांदो तशेच सर्वांचे आरोग्य कुशल राहो तसेच येणारे प्रत्येक वर्ष हे सर्वांसाठी सुखाचे आणि समृद्धीचे राहो  अशी प्रार्थना आई महालक्ष्मी मातेच्या चरणी मनोभावे केली …
Navaneet Kaur Instagram – दिल्ली येथे घेतली केंद्रिय ऊर्जामंत्री राजकुमार सिंग यांची भेट,धारणी मेळघाट, चिखलदरा तसेच जिल्ह्यातील सीमावर्ती ग्रामीण भागातील विद्युत व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी केली निधीची मागणी, केंद्रीय उर्जामंत्र्यांनी जिल्ह्याच्या विद्युत विषयक सुधारण्यासाठी मंजूर केला 189 करोड चा निधी केला मंजूर,सध्या मेळघाटातील सीमावर्ती भागातील गावांमध्ये अद्यापही मध्य प्रदेशातील पॉवर स्टेशन मधून विद्युत पुरवठा होतो आता हरीसाल येथे 9 करोड 40 लाख रुपये खर्चून 33 kV चे सबस्टेशन निर्माण करण्यात येणार असून,धारणी येथे दोन, चांदुर रेल्वे येथे दोन तर संपूर्ण जिल्ह्यात 33 kV चे 10 ते 12 सबस्टेशन निर्माण करण्यात येणार असून आता जिल्हा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन जिल्हावासीयांना लोडशेडिंग च्या जाचातून कायमस्वरूपी मुक्ती मिळणार आहे.
 मेळघाटातील जरीदा येथें आजही मध्यप्रदेशातून वीजपुरवठा केला जातो ज्यासाठी जिल्ह्याचे प्रतिमाह 2ते 3 करोड रुपये मध्यप्रदेश शासनाला जातात आता या ठिकाणी सबस्टेशन उभारून जिल्ह्यातील गावांना जिल्ह्यातूनच वीज पुरवठा केला जाईल ज्यामुळे करोडो रुपयांची बचत होईल व जरीदा सारख्या अनेक अतिदुर्गम गावांना 24 तास अखंडित वीजपुरवठा मिळेल.
 मेळघाटातील 24 गावे स्वातंत्र्य काळापासून अद्यपही अंधारात आहेत,या गावांना वीजपुरवठा व्हावा व या आदिवासींची सर्वांगीण प्रगती व्हावी अशी मागणी केंद्रीय ऊर्जामंत्री श्री राजकुमार सिंग यांचेकडे केली असता,,वनविभागाच्या एनओसी घेऊन तात्काळ या गावांना वीजपुरवठा करण्याचे निर्देश यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी संबंधित सचिवांना दिले.
या 189 करोड च्या निधीतून जिल्ह्यातील जुनी ट्रान्सफॉर्मर बदलणे, विजेची गळती थांबविणे तसेच अमरावती-बडनेरातील सर्व विद्युत पोल हटवून विजेच्या तारा भूमिगत(,अंडरग्राऊंड )जोडणी करणे जेणेकरून कुणालाही शॉक लागणार नाही व मुंबई-पुणे-नागपूर प्रमाणे भूमिगत जोडणीद्वारे अमरावती जिल्हा हा वीज हानी मुक्त,होईल.
 खासदार झाल्याबरोबर विजेच्या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घातले होते,सुमारे एक वर्ष आधी विद्युत वितरण कंपनी च्या कार्यालयात मुख्य अभियंता श्रीमती  गुजर व अधीक्षक अभियंता श्री खानंदे यांना याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते.
या सर्व प्रस्तावांचा दिल्ली दरबारी सातत्याने पाठपुरावा केला व त्याचेच फलित म्हणून केंद्रीय ऊर्जामंत्री राजकुमार सिंग यांनी मागणीनुसार जिल्ह्याच्या विद्युत विषयक समस्या सोडविण्यासाठी व आधुनिक सुधारणेसाठी 189 करोड रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur