Sonali Kulkarni Instagram – आमची स्पार्कल ३ वर्षाची झाली 🥰
एक चिमुकलं अशक्त चार दिवसाचं पिल्लू रूमानानी एका भंगार गाडीच्या बॅानेटमधून वाचवलं होतं..आम्हाला श्रुतीनी ताबडतोब सांगितलं आणि कावेरी ह्या पिल्लासाठी कासावीसच झाली ! फोटो बघूनच कावेरीनी तिचं नाव ठरवलं आणि स्पार्कलचं आमच्या कुटुंबात आगमन झालं 🐈⬛
गेल्या आठवड्यात तिसऱ्या वाढदिवसाला अनेक पाळीव’ कुटुंबीय आले होते.. नशिबाने माझं ठरलेल्या वेळी पॅकअप झालं.माझी शेजारी – पूजा मिश्राने अगदी आम्हाला हवा तसा केक बनवून दिला 🎂
आधी गणपतीबाप्पांची आरती झाली 🙏 तेंव्हा स्पार्कल आली होती पण केक कापायच्या वेळी मात्र तिनी तिची जागा सोडलीच नाही 😂 मग ताईनी एवढासा घास घातला नंतर !
फार मज्जा आली आम्हाला..
आमच्या ह्या द्वितिय कन्येला वाढताना बघणं हा आमच्या आनंदाचा अविभाज्य घटक होऊन बसला आहे ♥️
Love you Sparkle 😘 Meow..
⭐️⭐️⭐️P S .. DONT MISS THE DRESSCODE 😎 B&W
#sparkle #sparklepantvaidya
#kaveripantvaidya #siscat
#cat #rescued #petparents #petsofinstagram #catsofinstagram #instacats
#catstagram #petstagram #pets #petlovers | Posted on 14/Sep/2022 14:16:17