Sonalee Kulkarni Instagram – कायमच आपण करत असलेल्या कामातून “आनंद” शोधत असताना आम्ही सगळेच कलाकार ते आमचं प्रत्येक काम पाहणाऱ्या रसिक प्रेक्षकांनाही “आनंद” देईल अशी प्रामाणिक आशा करत असतो …
माझ्या आजवरच्या कामांमधून तुम्ही तो “आनंद” टिपला आणि मला या पुरस्कारासाठी पात्र समजलंत या बद्दल कृतज्ञता व्यक्त करते 🙏🏻
या विशेष पुरस्कारबद्दल धन्यवाद @sunmarathi 🙏🏻
आणि आपण महिलांसाठी सुरू करत असलेल्या “आनंदी”
या नव्या व्यासपीठासाठी खूप साऱ्या शुभेच्छा 🙏🏻
बकुळा ते अप्सरा
पोश्टर गर्ल ते हिरकणी
आणि आता छत्रपती ताराराणी
अश्या विविध सशक्त स्त्री व्यक्तिरेखा साकारताना समाजातील अनेक महिलांकडून प्रेरणा मिळाली त्या सगळ्यांना हा पुरस्कार समर्पित करते 🙏🏻
#sonaleekulkarni #anandi #award #sunmarathi #navarashtra #planetmarathi #awards @navarashtra @planet.marathi Mumbai – मुंबई | Posted on 06/May/2023 16:38:21