Mukta Barve Instagram – नमस्कार!
आज आपल्या “प्रिय भाईं”चा स्मृतीदिन!
महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलेलं व त्यापुढे जाऊन साजरं केलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे! आम्ही पु. ल. आणि सुनीताबाई यांच्या सन्मानार्थ त्यांच्या काव्यप्रेमावर आधारित “प्रिय भाई… एक कविता हवी आहे” हा सांगीतिक अभिवाचनाचा कार्यक्रम करतो. काल आम्ही पु. लं. च्या स्मृतीप्रित्यर्थ आमचा वर्षपूर्तीचा प्रयोग साजरा केला.
या संपूर्ण वर्षभरात आम्ही दर प्रयोगागणिक भाई, सुनीताबाई आणि त्यांची लाडकी कविता यांच्या आणखी जवळ जात आहोत आणि अनेक प्रेक्षकांना त्यांच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की, पु. ल., सुनीताबाई आणि प्रेक्षक यांच्या मध्ये या प्रयोगाच्या निमित्ताने आम्ही माध्यम बनतो आहोत. परंतु, आम्हाला याची खात्री आहे की, आमच्यावर पु. ल. आणि सुनीताबाईंचा आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा प्रवास अशक्य आहे.
खरंतर, पुलंच्या बाबतीत अनेकांनी भरभरून बोललं, लिहिलं आहे. त्यात आम्ही काहीतरी वेगळं सांगावं असं काही नाही. पण, सध्या मनात इतकंच येतं आहे की, जसं क्रिकेट मध्ये एक वाक्य वापरले जाते, “Form is temporary, but class is permanent” म्हणजे काय तर पु. ल. आणि सुनीताबाई! आज पुलंना जाऊन तब्बल तेवीस वर्ष झाली, परंतू या तेवीस वर्षात मराठी मनाला अजिबात त्यांचं विस्मरण झालेलं नाही याचा प्रत्यय आम्हाला प्रत्येक प्रयोगात येत असतो.
आमच्या प्रयोगाला काव्यप्रेमींचे व पु. ल. प्रेमींचे भरभरून प्रेम, सदिच्छा व आशीर्वाद मिळत आहेत. हे प्रेम इथून पुढील काळात देखील असेच मिळत राहील ही आशा आहे. आपल्या या प्रेमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.
प्रिय भाईंना म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांना आमच्या संपूर्ण टीम कडून विनम्र अभिवादन!
– टीम “प्रिय भाई… एक कविता हवी आहे!” | Posted on 12/Jun/2023 18:22:22