Mukta Barve Instagram – माणूस म्हणून, स्त्री म्हणून, आई बायको, प्रेयसी ,मुलगी, मैत्रीण आणि अभिनेत्री म्हणून अनेक प्रश्न मनात कोलाहल माजवत असतात.
नातेसंबंध – समाज – संस्कृती यांचं नातं कसं लावयचं याचा विचार चालू असतानाच लिव्ह उलमन या जगप्रसिद्ध अभिनेत्रीचं ‘choices’ नावाचं मृणाल कुलकर्णी यांनी स्वैर अनुवादित केलं पुस्तक हातात पडलं. ते वाचत असताना भाषा, वय, देशाच्या सीमा पार करून सगळंच जवळचं आणि ओळखीचं वाटत गेलं..
लिव्हला जे म्हणायचंय ते मृणाल कुलकर्णींनी अगदी ओघवत्या अकृत्रिम भाषेत आपल्या पर्यंत आणलं त्यासाठी तिचं खूप अभिनंदन आणि कौतुक.
आमच्या चौघींच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं याचा आम्हाला खूप आनंद झाला.
ग्रंथाली प्रकाशनाने काढलेलं हे पुस्तक नक्की विकत घेऊन वाचा..
@mrinalmrinal2 खूप खूप प्रेम! 🙂♥️
@granthaliwatch शुभेच्छा! | Posted on 29/Oct/2023 14:50:54