Aarya Ambekar Instagram – माझं नवीन गाणं सर्व म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर आता ऐकू शकतो,
httpsw://linktr.ee/hrishikeshv
गायिका – आर्या आंबेकर
संगीतकार – तुषार पंडित
गीतकार – हृषिकेश विदार
संगीत संयोजन – अथर्व जोशी
बासरी – वरद काठापुरकर
चित्र – श्री. राम जोशी
व्हिडिओ – आशुतोष रसाळ
रेकॉर्डिंग इंजिनियर – मुकुंद
Mix and Mastered by – Tushar Pandit, at Dawn Studio, Pune
भगवान श्रीकृष्ण गोकुळातून निघून गेल्यानंतर अनेक गोपिका बऱ्याच काळापर्यंत विरहाने व्याकुळ झाल्या होत्या. त्यातीलच एका गोपिकेची व्यथा सांगणारं ‘मंजिरी’ हे गीत आहे.
मंजिरी
अगा माझिये सावळे
कुणालागी हाकारसी?
गोकुळातूनी जे गेले
भूत का पुन्हा मागसी?
नसे ज्यातुनी सुटका
निळे विष ओठांवरी
त्यास घेउनी जायचे
निळ्या पैलतीरावरी
अशी वेदना सावळी
तुला भोगण्या लाभली
तुझ्या देहाची पावरी
सातासुरात नाहली
झाले सार्थक सार्थक
तुला भेटला श्रीहरी
तुझ्या राखेतून उद्या
उगवेल गा मंजिरी
– हृषिकेश विदार
@ambekaraarya @hrishikesh_vidar @infinite_diver @varadflute_official @ashutosh_1012 @dawnstudioz
#Manjiri #NewSong #TusharPandit #AaryaAmbekar #marathisong link post madhe pantaktoy 👇 Nanded City, Pune | Posted on 30/Sep/2023 09:59:24



