Hemangi Kavi Instagram – रविंद्रदादा बेर्डे गेल्याची बातमी कळली आणि मी थेट कोल्हापुरात पोचले. २००८ साली ‘धुडगूस’ चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापुरात केलं होतं. त्यात मी रविंद्रदादांच्या मुलीचं काम केलं. तोपर्यंत मी त्यांना विनोदी भुमिकांमध्ये पाहीलं होतं. पण धुडगूस मधला त्यांनी साकारलेला बाप, निव्वळ कमाल. हा प्रसंग माझा सर्वात आवडता आहे. यातली बापाची हतबलता, चुकीच्या घरात मुलीचं लग्न लावून दिल्याचा पश्चाताप, आता आपण मुलीसाठी काहीच करू शकत नसल्याच्या जाणिवेने कासावीस झालेला चेहरा हे सग्गळं काहीही न बोलता अगदी मोजक्या expressions मध्ये दाखवणं खुप कठीन असतं जे त्यांनी सहजगत्या केलं होतं. मला आठवतंय हे सगळं one take मध्ये झालं होतं. जो नट इतकी वर्ष हसवत आला त्याला असं रडताना पाहून काळीज पिळवटून निघतं! माझं तरी निघतं!
ज्यांना लहानपणापासून पडद्यावर पाहत आलो त्यांच्याबरोबर screen share करायला मिळणं खुप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी!
We will Miss u! 🙏🏽😔
#RavindraBerde #Actor #Dhudgus | Posted on 13/Dec/2023 19:02:53



