Spruha Joshi Instagram – तुझ्या आत काही नवे उमलताना, नको घाबरू
तुझ्या आतला सूर्य तेजाळताना, नको घाबरू!
नवी वाट शोधायची वेळ झाली, प्रवासात या
सकाळीसकाळीच अंधारताना नको घाबरू!
अशा उंच लाटांत मस्तीत रमणे तुला आवडे,
पुन्हा खोल पाण्यामध्ये उतरताना नको घाबरू..
कुणी वार केले, किती घाव झाले मनावर तरी
जिवापाड जखमा अशा विसरताना नको घाबरू.
नव्याने उद्या तू फुलव वेगळ्या जाणिवांच्या कळ्या
फुले आजची मात्र कोमेजताना नको घाबरू..
बहर श्वास रोखून सारे उभे नेहमीसारखे
तुझ्या आतुनी आज मी बहरताना नको घाबरू!
– स्पृहा. | Posted on 03/Dec/2023 13:17:08



