Jui Gadkari Instagram – फोटोतल्या आईशी फोनवर बोलावं…
सुप्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री रोहिणी निनावे यांच्या ‘सातवा ऋतू’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच झाले. या काव्यसंग्रहातील ‘आई’ या हृदयस्पर्शी कवितेचे वाचन करताना अभिनेत्री जुई गडकरी.
‘आई’ म्हणजे आपल्या प्रत्येकाचा वीक पॉईंट. जुईच्या तोंडून ‘आई’ कविता ऐकताना कळत न कळत डोळ्यांच्या कडा जशा अश्रूंनी डबडबून जातात. तसेच ही कविता मराठी भाषेच्या समृद्धतेची आणि सोपेपणाची प्रचिती देते. अगदी आपल्या प्रत्येकाच्या आई सारखी सोपी, सरळ आणि तितकीच भावस्पर्शी! सर्वांना मराठी भाषा गौरवदिनाच्या शुभेच्छा!
भाग : १
#marathicelebs #marathicelebrity #juigadkari #marathikavita #rohinininave #marathiwriter #marathibhasha | Posted on 27/Feb/2024 09:50:55



