Sharmishtha Raut Instagram – सिनेमा रिलीजला आला की त्याबद्दल त्या चित्रपटातील कलाकारांचे मित्र कौतुकाच्या पोस्ट्स करू लागतात. प्रेक्षकही सुजाण आहेत त्यांना सुद्धा आता हे प्रमोशन आहे ब्वा हे कळलेलं असतं. कालची पोस्ट थोडीफार तशी होती. पण ही पोस्ट त्यातली आजिबात नाही.
तर ‘नाच गं घुमा’ चं स्पेशल स्क्रिनिंग काल पाहिलं. काय सुंदर सिनेमा बनवला आहे आमच्या मित्रांनी. नेहमीप्रमाणे परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी या जोडीने एक अप्रतिम चित्रपट बनवलेला आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक दृश्यात आपसूकच ‘वाह’ हे उत्स्फूर्तपणे येत होतं. प्रत्येकाला रिलेट होईल, आपली वाटेल पण तरीही एक वेगळा दृष्टिकोन देणारा हा चित्रपट आहे. खास मोकाशी शैलीचा.
सर्व निर्माते @madhugandhakulkarni @swwapnil_joshi @sharmishtharaut @tejas.desai.1044 @mayasabhakm #TruptiPatil सर्वांचे खूप खूप अभिनंदन. हिट आहे पिच्चर!
@sarangsathaye छोटी मायरा, @sukanyamoneofficial @supriya_pathare75 यांनी धम्माल उडवून दिलेली आहे, चित्रीकरणाच्या वेळेस तुम्हाला काय मज्जा आली असेल हे प्रत्येक दृश्यातल्या पिक्सल अन पिक्सल मधे जाणवत राहतं.
आपल्या सर्वांच्या लाडक्या कै. नरेंद्र भिडेंचा सुपुत्र @sinb_upon_cosb (तन्मय भिडे) या अवघ्या 22 वर्षाच्या मुलाने अप्रतिम संगीत/पार्श्वसंगीत दिलेलं आहे.
@sandeep.gnyadav अप्रतिम कॅमेरावर्क. छोट्या छोट्या जागांमध्ये तुझा कॅमेरा अजब जागा काढतो.
@shishirchousalkar अत्यंत विचारपूर्वक केलेलं तुझं साऊंड डिझाईन मज्जा आणतं. परेश सारख्या अत्यंत किचकट व्यक्तीबरोबर इतक्या कमी वेळात असं काम करणं काय असू शकतं हे मीच समजू शकतो.खूप कौतुक!
@faizee222 तुझ्या एडिटिंग मधे तुझी तुझ्या क्राफ्टच्या rhythm वर असलेली पकड सतत जाणवते. काही काही कट्स हे फक्त तूच देऊ शकतोस. अप्रतिम काम!
आता दुसऱ्या फोटोबद्दल.
काल @muktabarve न्हवती नाहीतर तिच्या बरोबर पण फोटो काढला असता. तिचा कमाल अभिनय, विनोद, इमोशन, कल्लोळ सगळंच भारी. मोठ्या पडद्यावर तिची भन्नाट राणी बघाच बघा.
आणि ही आपली @namrata_rudraaj आपल्या सगळ्यांची नमा. व्हेंटिलेटर सिनेमात तिच्याबरोबर पहिल्यांदा काम केलं. तेंव्हापासून ती माझी एक फेव्हरेट अभिनेत्री आहे. पण तिच्या कुवतीचा रोल तिला आजपर्यंत मिळाला न्हवता असं वाटत राहतं. कॉमेडी तर ती झोपेतून उठून पण करेल. पण त्याचबरोबर या सिनेमातील आशाताई नावाचं पात्र तिने त्यातल्या बारीक बारीक जागा, मुद्राभिनय, श्वासोच्छ्वास, संवादफेक, देहबोली या सर्वाचा अप्रतिम वापर करत अक्षरशः जिवंत केलं आहे. Hats off to you नमा!
धन्यवाद team नाच गं घुमा ❤ | Posted on 30/Apr/2024 08:07:40
Check out the latest gallery of Sharmishtha Raut



