Prasad Oak

Prasad Oak Instagram – “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते” असं म्हणतात ना ??? (कित्ती टिपीकल वाक्य आहे ) 😀
पण एका यशस्वी आई च्या मागे एक “मधे मधे न येणारा” बाबा असतो..
तू “तो” बाबा आहेस प्रसाद… 🤞🏼
२/३ वर्षातून एकदाच parents meeting ला जाऊन.. मुलांच्या complaints ऐकल्यानंतर.. तिथून येताना मुलांना कबुतरांना दाणे खायला घालणारा बाबा आहेस तू…🥰
“बाबाला विचारून सांगते” असं माझ्या तोंडून ऐकल्यावर त्यावर भाबडे पणानी विश्वास ठेवणारा बाबा आहेस तू…
अचानक “अभ्यासाविषयी चौकशी करणारा” आणि त्यावर “स्वतःच हसणारा” बाबा आहेस तू…😂
घरात मंजू च boss आहे हे आपल्या आयुष्याच्या पहिल्या क्षणापासून accept करणारा बाबा आहेस तू…👍
अचानक कधीही मुलांना “ठीक आहेस ना” असं विचारणारा बाबा आहेस तू…🤷🏽‍♀️
मुलांच्या वेगवेगळ्या वयात तुझ्या “त्याच वयात” राहिलेला बाबा आहेस तू…🤦🏽‍♀️
लहानपणी मुलांना आणलेली खेळणी त्यांच्याशीच भांडून खेळणारा बाबा आहेस तू…
आणि मोठे झाल्यावर त्यांचे नवे “shoes” त्यांना न सांगता हळूच घालून जाणारा बाबा आहेस तू…
थोडक्यात काय , एका “गुणी आईच्या मुलांचा” बाबा आहेस तू…😜

मुलं आणि मस्कारा पण मोठी झाली प्रसाद….
तू कधी होणार????😂😂

पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांच्या डोळ्यात ज्याच्याविषयी अत्यंत आदर आणि प्रेम असणारा बाबा आहेस तू ….♥️♥️

अरे by the way
HAPPY FATHERS DAY…!!! | Posted on 16/Jun/2024 12:39:42

Prasad Oak
Prasad Oak

Check out the latest gallery of Prasad Oak