Navaneet Kaur Instagram – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र १५८००, लाभार्थी लाडक्या बहिणींना सांस्कृतिक भवनात आयोजित भव्य दिव्य कार्यक्रमात प्रमाणपत्र व साडी चोळीचे वाटप
उपस्थित लाडक्या बहिणींनी ओवाळणी घालताना शपथ घेऊन सांगितले की आमचा भाऊ रवी राणा यांचे केसालाही सुद्धा धक्का लागू देणार नाही
महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांचे आरोग्य सुधारणा करण्यासाठी कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या लाडकी बहीण योजनेच्या बडनेरा मतदार संघातील समितीच्या माध्यमातून आमदार रवी राणा यांनी अध्यक्ष म्हणून पाठपुरावा करून लाडक्या बहिणी योजनेच्या अर्जाची यशस्वी प्रोसेस करून लाडक्या बहिणींचे प्रकरण पात्र करून भावाचे कर्तव्य पार पाडले. अशा पात्र झालेल्या पंधरा हजार आठशे लाडक्या बहिणींना आज १२ऑगस्ट २०२४ रोजी सांस्कृतिक भवन सभागृहात आयोजित केलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात माजी खासदार नवनीत राणा, राज्यसभेचे खासदार डॉ अनिल बोंडे यांच्या हस्ते शासनाच्या अधिकाऱ्यांचे उपस्थितीत प्रमाणपत्र व साडी चोळीचे वाटप करण्यात आले. हा महाराष्ट्रातील आयोजित केलेला व यशस्वी केलेला प्रथमता हा अभिनव कार्यक्रम असल्याचे सर्वत्र चर्चा होत होती. या कार्यक्रमाचे वेळी सहा.जिल्हाधिकारी पी.एम. मनू भा.प्र.से.निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर ,महिला बाल विकास अधिकारी घोडके, भडांगे, तहसीलदार विजय लोखंडे, सीडीपीओ दुर्गे ,घनतोडे अंगणवाडी सुपरवायझर चिखलकर ठाकरे, कातोरे, ब्राह्मणे ,काळे ,पाटेकर , | Posted on 12/Aug/2024 17:50:04



