Aarya Ambekar Instagram – खूपच चिंताजनक बातम्या वाचनात येत आहेत – पुण्यातील अपघात, कोलकत्ता डॉक्टर प्रकरण, किंवा एका कुटुंबाचे धरणात वाहून जाणे.
या घटनांमधील एक सामान्य धागा असा वाटतो की लोकांनी घाबरणं सोडूनच दिलंय. किंवा लोक भिती व्यक्त करायला reluctant आहेत याची चिंता वाटते.
आजकाल भिती आणि anxiety यासारख्या मूलभूत मानवी भावना सुद्धा चुकीच्या प्रकारे दाखवल्या जात आहेत ( जीवनात आवश्यक असणाऱ्या प्रमाणातल्या भीती व anxiety याबद्दल बोलते आहे).
याचा परिणाम म्हणून लोक भिती दाखवायलाच तयार नाहीत. कदाचित वाढती अनियंत्रित वर्तनं ह्याचाच परिणाम असेल का?
असं वाटतं शाळांमध्ये एनसीसी सारखे discipline चे आणि मनोविज्ञान शिक्षणाचे, थेरपीचे धडे समाविष्ट करणं आवश्यक झालं आहे.
या स्वातंत्र्य दिनी, आपल्याला एकमेकांना असमर्थता व्यक्त करण्याची मुभा देऊया आणि असमर्थतेला निर्बंधांशिवाय स्वीकारूया. | Posted on 14/Aug/2024 21:58:40



