Smita Shewale Instagram – ‘कबीर ची आई’ ही ओळखच मला इतकी आवडते. जगात येऊन काहीतरी भारी गोष्ट झाली आहे असं कायम वाटतं..माहित नाही का.. मला लहान बाळं खूपच आवडायची म्हणूनच आई होण्यासाठी मी आतुर होतेच पण ही बाळ जेव्हा मोठी होतात तेव्हा आई सुद्धा मोठी होत जाते. अनुभवी होत जाते. माझ्यातली ही अनुभवी आई मला आवडायला लागली. मलाच मी आवडू लागली आहे.. सेल्फ लव काय म्हणतात ना ते हेच असावं… आणि असं स्वतःवर प्रेम करायला माझ्या कबीर ने मला शिकवलं… आज त्याचा वाढदिवस… त्याला जगातल सगळं सुख मिळो म्हणून कायम देवापाशी प्रार्थना करणारी तुझी आई सदैव तुझ्या चढत्या उतरत्या काळात बरोबर असेल.. हसरी आई.. देवाचे खूप खूप आभार..☺️🤗#smitashewale #kabirsmom #gratitudeattitude #explorepage | Posted on 30/Sep/2024 12:25:58
Check out the latest gallery of Smita Shewale


