Vanita Kharat Instagram – भाकरी चतकोर तुकडा वाढ माई
मात्र साळंला मला तू धाड माई
दूर जाताना उरी हा कालवा का?
चाखले आसू तुझे तर, ग्वाड – माई
मी शहाण्या सारखी वागेन तिकडं
लेकरू उरणार नाही द्वाड – माई
लोड गाद्यांना कुशीची ऊब नसते
नीज येते गोधडीतच गाढ माई
लेक शिकते अन् पिढ्या घडतात पुढल्या
त्या क्षणी येते तुझी गं याद माई
– मंदार चोळकर
सावित्री उत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा 🙏❤️
#savitribaiphulejayanti
#आम्हीसवित्र्याच्यालेकी
#३जानेवारी | Posted on 03/Jan/2025 17:46:02



