Rashmi Anpat Instagram – गौराई.❤️ आज आपल्या सिरीज चे पाच एपिसोड पूर्ण झाले त्या निमित्ताने ह्या सिरीज बद्दल थोडं बोलूया.. मुळात ही सिरीज मी लिहायला घेतली तेव्हा इच्छा फक्त इतकीच होती की लोकांना नवरा बायको आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये नक्की काय फरक असतो हे कळावे. लोकांनी ह्या सिरीज ला पसंत करण्याचे कारणच हे आहे की प्रत्येकाच्या स्वप्नातील पार्टनर आम्ही इथे उभा केला आहे. आज असंख्य पॉजिटिव कमेंट्स मध्ये काही कमेंट अश्या असतात की हे फक्त रील मध्येच शक्य आहे खऱ्या आयुष्यात नाही वगैरे वगैरे.. पण नवरा आणि बायको मधला समंजसपणा कसा असावा हे जर आपण सतत वीडियो च्या माध्यमातून दाखवत राहिलो तर १० मधले किमान ३ तरी सुधारतील एवढं नक्की. जसे आपल्या पार्टनर मध्ये आपल्याला मोठं करायची ताकद असते तसेच आपल्या आयुष्याची राख करायची ताकद देखील असते पण गौराई सिरीज मुळे लोकांच्यात झालेले बदल जेव्हा मला मेसेज बॉक्स मध्ये दिसतात तेव्हा खूप कमाल वाटतं. लिहायला काय खोलात जाऊन काहीतरी वेगळं काहीतरी भन्नाट सुद्धा लिहू शकेन पण सध्या माझ्या स्वप्नातली गौराई मला कागदावर उतरवायला जास्त आवडतं..❤️ असेच प्रेम करत रहा.. कायम.😍🥰 #गौराई #rashmianpat #sanketkorlekar | Posted on 13/Feb/2025 12:33:54
Check out the latest gallery of Rashmi Anpat



