Rashmi Anpat Instagram – आज आपल्या गौराई सिरीज चे सोशल मिडिया वरती 100 मिलियन व्यूज पूर्ण झालेत.🙏🏻 आम्ही तुमचे कसे आभार मानावे तेच कळत नाहीये. एका मराठी शॉर्ट सिरीज ला महाराष्ट्रातून मिळणारे कोट्यावधींचे प्रेम आमच्यासाठी प्रचंड कौतुकास्पद आहे. आम्ही तेव्हाच जिंकलो जेव्हा आमच्या मेसेज बॉक्स मध्ये खूप लोकांनी त्यांच्या रिलेशनशिप मध्ये गौराई चे व्हिडिओस बघून प्रेम कसे वाढले हे सांगितले.गौराई मध्ये आम्ही बरेच विषय मांडले.. अचानक जाणारी नोकरी , बायकोची मासिक पाळी , समाजातील बायकोवर लादलेली बंधनं अश्या बऱ्याच विषयांमध्ये आम्ही हात घातला आणि आमच्या सुदैवाने वाईट कमेंट करणाऱ्यांपेक्षा पॉजिटिव कमेंट करणारे प्रेक्षक आम्हाला जास्त लाभले. लोकांचं काय… आम्ही मासिक पाळी वर एवढा सुंदर वीडियो बनवला त्यातही त्यांना चुकाच काढायच्या होत्या. बायकोला Pad आधीच आणून ठेवता येत नाही का किंवा ऑनलाइन १० मिनिटात Pad मागवता येत नाही का अश्या कमेंट्स आम्हाला केल्या. आत्ता आम्ही अपलोड केलेला वीडियो जो लहान कपडे घालावे की नाही ह्यावर बनवला आणि त्याचावर सुद्धा काही लोकांनी संस्कृती मध्ये आणली पण आपली बायको जर खरच गौराई सारखी संस्कारी आणि समंजस असेल तर कधीतरी एखाद दिवस तिला मोकळीक दिली तर अडते कुठे ? नात्यात विश्वास असेल तर नातं टिकेल जर कुणी प्रामाणिक नसेल तर तुटेल. आता तुटू नये म्हणून तिला कायम बंधनात ठेवणे चुकीचे आहे. तो वीडियो संस्कारांबद्दल नव्हता तर नात्यातील मोकळीकतेबद्दल होता.अश्या ह्या निगेटिव कमेंट्स मधून उरलेल्या सगळ्यांनी इतकं भरभरून प्रेम दिले की आम्ही नंतर थांबलोच नाही आणि आज १०० मिलियन पर्यंत येऊन पोहोचलो. तुमचं प्रेम असेच भरभरून आमच्यासोबत राहूदेत. सकारात्मक रूपाने गौराई कडे बघणाऱ्यांचे कायम स्वागत..❤️ शुभेच्छा सोबत असुदेत..😘 | Posted on 22/Feb/2025 13:36:10
Check out the latest gallery of Rashmi Anpat



