Amruta Subhash Instagram – सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक सदिच्छा ! आमच्या ‘असेन मी… नसेन मी…’ या नाटकात एक अपूर्व योगायोग आहे. या नाटकातील आम्ही सर्व कलाकार, लेखक सुद्धा आहोत आणि आम्हा सगळ्यांची पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. नीना कुळकर्णी यांचे ‘अंतरंग’, शुभांगी गोखले यांचे ‘रावा’, अमृता सुभाष हिचे ‘एक उलट एक सुलट’, संदेश कुलकर्णी याचे ‘मॉंटुकले दिवस’ आणि ‘पुनश्च हनिमून’ हे नाटक. आम्ही ‘मराठी भाषा गौरव दिन’ ह्याचे निमित्त साधून ही सर्व पुस्तके आमच्या प्रयोगानंतर विक्रीला ठेवली आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता आम्ही कायम ही पुस्तके प्रयोगानंतर विक्रीस ठेवणार आहोत. त्या बद्दल नाट्य रसिकांचे आणि वाचकांचे मनापासून आभार. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. ती खऱ्या अर्थाने टिकायची असेल तर मराठी वाचली गेली पाहिजे …बोलली गेली पाहिजे… आम्ही आमच्या परीने त्याचा प्रसार करत आहोत. पुढील प्रयोग मार्च (असेन मी नसेन मी)
रविवार २ रात्रो ८.३० कालिदास, मुलुंड
शनिवार ८ सकाळ ११ शिवाजी मंदिर,
रविवार ९ दुपार ४ ठाकरे, बोरिवली
शनिवार १५ पुणे
12.30 बालगंधर्व
५.३० अण्णाभाऊ साठे
रविवार २३ सकाळ ११ दीनानाथ, पार्ले
Booking on BMS
https://in.bookmyshow.com/plays/asen-me-nasen-me/ET00421962
असेन मी… नसेन मी..’
लेखक -संदेश कुलकर्णी
दिग्दर्शक -अमृता सुभाष
कलाकार- नीना कुळकर्णी, अमृता सुभाष, शुभांगी गोखले
नेपथ्य, प्रकाश -प्रदीप मुळ्ये
संगीत- साकेत कानेटकर
वेशभूषा- श्वेता बापट
पब्लिसिटी डिझाईन- सचिन गुरव पब्लिसिटी स्टील्स – प्रथमेश रांगोळे सोशल मीडिया- वैभव शेटकर
सूत्रधार- दिगंबर प्रभू
निर्मिती- स्क्रिप्टीज क्रिएशन्स रंगाई | Posted on 27/Feb/2025 10:07:36



