Hemangi Kavi

Hemangi Kavi Instagram – माझ्या माहेरी, सासरी गणपती बसवत नाहीत. पण कुणास ठाऊक कसं दरवर्षी माझ्या हातून गणपती घडतोच मग ते चित्रातून असो, sketch मधून असो किंवा मग हे असं मुर्तितून! म्हणजे एका अर्थी बसतोच. निमित्त होतं @zeetv च्या ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या मालिकेमध्ये एका scene साठी देवीची मुर्ति बनवण्यासाठी शाडूची माती आणली होती. ती पाहताच माझे हात त्या मातीला आकार द्यायला शिवशिवायला लागले. मातीचा गोळा हातात घेतला खरा पण कळेना नक्की याचं करू काय? मग काय जगातला सर्वात सोप्पा आकार माझ्या बोटांमधून जन्म घेऊ लागला आणि शेवटी त्याचा गणपतीच झाला!
माझा कर्म कांडात मन रमत नाही त्यामुळे मी कधीच त्या वाट्याला जात नाही पण म्हणून ज्यांचा विश्वास आहे, ज्यांचं देवाचं सगळं करण्यात मन रमतं त्यांना थांबवत नाही, चुकीचं आहे सांगायला जात ही नाही. तुझी भक्ती तुझ्याकडे, नको सक्ती माझ्याकडे. तु खुश मी ही खुश! आमचा माणूस तर गणेश भक्त, दर गुरवारी मठात जाणे वगैरे करतो. मला वेळ असेल, वाटलं तर त्याला सोबत करते. दिवस पाळणे, उपवास करणे माझ्याच्याने होत नाही आणि आपला त्यावर विश्वास ही नाही.
पण काय गंमत आयुष्यात पहीलं चित्र काढलं ते गणपतीचं, बक्षीसही मिळालं आणि कलेचा श्रीगणेशा ही झाला! ही उपासना अशीच चालू राहो हीच इच्छा!

तुम्हां सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा! बोला…

🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺

त.टी.: Trollers ना नम्र विनंती, Troll करायची घाई करू नये. कोणी कुठे पळून जात नाहीए तेव्हा आरामात, शांतेत trolling करावं! समजा नाहीच झेपलं तर डावीकडून सरळ exit घ्यावी!

Wish you all a very Happy Ganesh Chaturthi!
Ganpati Bappa Moraya

#गणेशचतुर्थी #गणपतीबाप्पामोरया #गणेशआगमन #ganpatibappamorya | Posted on 06/Sep/2024 18:08:02

Hemangi Kavi

Check out the latest gallery of Hemangi Kavi