Amruta Subhash Instagram – 🧘😇
संदेशनी नवीन नाटक माझ्या घरी वाचून दाखवलं.. अमृतानी त्यातली एक भूमिका मला देऊ केली..तालमींना अवकाश होता.. ते दोघे त्यांच्या “पुनश्च हनिमून “नाटकाच्या दौ-यावर अमेरिकेला गेले महिनाभरासाठी..पण जाण्याआधी तीने एक link पाठवली सौरभ बोथ्राच्या १४ दिवसांच्या मोफत योगवर्गाची.. सौरभ बोथ्राचे अनेक व्हिडीओज् YouTube वर पाहिलेच होते मी..१४ दिवसांत इतकं छान वाटायला लागलं.. लगेच वर्षभराचं सदस्यत्व घेऊन टाकलं..🌻🧘😌
आणि उशिरा का होईना सातत्य आलं..
काय असं विशेष वाटलं?!
सकाळी ३ न् संध्याकाळी३ अशा batches..कुठलीही एक गाठणं सोपं झालं.
धडपडून कुठे जायचा त्रास नाही..
आसनं काही नवीन नव्हती.. पण रोज काहीतरी नवीन, साधंसोपं. आठवड्याभरात संपूर्ण शरीरासाठी चलन..🙂
एक तरूण मुलगा अतिशय प्रेमळ आवाजात रोज आपल्या घरी ( online) येतोय न् योगाभ्यास करून घेतोय..जादुई परिणाम झाला😇😊
कुठलीही batch घेतली तरी लाखभर लोकांबरोबर आपण सामील झालोय घरबसल्या😌फारच मजा यायला लागली..
सौरभ नी सगळ्यांचं मन जिंकलंय.. खरंच💙
आता सहाच महिने झालेत खरंतर मला Habuild ला जॉईन होऊन.. पण मी मनाशी ठरवलं होतं नाटकाच्या प्रयोगानिमीत्त नागपूरला जाणं होईल तेंव्हा नक्की सौरभला भेटायचंच😇
आणि आज सकाळी दारावरची बेल वाजली न् साक्षात सौरभ बोथरा दारात 🥹😯🙃🙂🙂🙂💙
कमाल च झाली बाबा!!!
Thank you Saurabh n Kashishji!!!💜🌷for the surprise visit🎈😎🥹lots of love 🌷🙏🏼 | Posted on 05/Apr/2025 12:13:20
Check out the latest gallery of Amruta Subhash



