Gauri Kulkarni Instagram – आपण कधी मोठे झालो ना..?🥺
लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीची वाट पाहायचो… पेपर देऊन घरी आलो की दिवसभर फक्त खेळत बसायचो… ४-८ दिवस झाले की, ‘कंटाळा आलाय आई… काय करु बाबा..?’ असे प्रश्न विचारत आई बाबांना त्रास द्यायचो.
आता आपला उन्हाळा असा नसतो… AC मध्ये बसलोय… मित्रांसोबत फिरायला जातोय… हवं ते करतोय…
पण… आपले आई-बाबा तसेच आणि तिथेच आहेत अजुन… मी उन्हाळ्यात, आई बाबांना पापड कुरडया बनवताना, माझ्या लहानपणापासुन बघतेय… आणि आजही जेव्हा मी उन्हाळ्यात घरी जाते… तेव्हा तेच चित्र मला दिसतं… किती गोड ना..?
आपण ना पटपट मोठे होतो… पण आपले आई बाबा आपल्यासाठी ज्या गोष्टी लहानपणी करायचे… त्या ते अजुनही करत असतात… आपल्या मुलांना काय हवं… वर्षभर काय लागेल… हे सर्व त्यांना माहीत असतं… आणि कितीही वय झालं तरीही त्या गोष्टी करणं ते सोडत नाहीत… त्यांची जबाबदारी ते कधीच टाकत नाहीत…
आई बाबा असेच असतात… थंडीत मऊशार उब देणारे… चरचरीत उन्हात सावली देणारे… आणि हो… उन्हाळ्यात न चुकता वर्षभर पुरतील एवढे पापड कुरडया करणारे… 😄
उन्हाळ्याची अशी तुमची कोणती आठवण आहे..?😃
.
.
.
.
#AaiBaba #MomDad #Childhood #Nostalgia #Summers #Unhala #Athvan #blessed | Posted on 20/Mar/2025 14:49:19



