Hemangi Kavi

Hemangi Kavi Instagram – साडी आता माझी जणू second skin च झालीए. लहान असताना आईच्या साड्या नेसण्याची निव्वळ हौस पुढे जाऊन आपल्या career चा अविभाज्य घटक बनेल असं स्वप्नात ही वाटलं नव्हतं. शाळेच्या fashion show पासून ते आता आतापर्यंत म्हणजे ह्या साडीचंच घ्या की ‘साडी हे वस्त्र अंगाला जे चिकटलं ते कायमस्वरूपी’. मला वाटतं बाकी कुठल्याही प्रकारच्या कपड्यांपेक्षा साडी हा प्रकार मी जास्त नेसलाय किंवा नेसावा लागलाय म्हणणं योग्य ठरेल कारण एकांकिका असो, नाटक असो, मालिका असो नाहीतर चित्रपट असो मी साडी नेसलेल्या भूमिका जास्त केल्या आहेत तेव्हा अपरिहार्याने साडी नेसणं अनिवार्यच होत गेलं आणि मला ते आवडतं ही.
परवा बीडला एका कार्यक्रमाला गेले होते. Early morning flight असल्यामुळे ‘Airport look’ च्या फंदात न पडता जाताना सरळ track pant and tshirt घातला होता. त्याच रात्री परतायचं होतं म्हणून १ extra tshirt घेतलं आणि कार्यक्रमासाठी ही साडी.
शाळेचा रौप्यमहोत्स्वी कार्यक्रम संपायला उशीर झाला. वाटलं…झालं मुंबईला परतायचं विमान माझ्याशिवाय उडणार. मी आयोजकांना म्हटलं “Airport साठी गाडी तयार ठेवा, मी साडीतच जाईन, तिथे वेळ मिळाला तर कपडे change करेन”. नशीबाने मी airport ला वेळेत पोचले. कपडे बदलायचे होते म्हणून Bag check in केली नाही. Gate वर गेल्यावर कळलं तर flight delay झालंय. म्हटलं चला आता आरामात change करेन. पण कुणास ठाऊक कपडे change करायचा माझं मनच होईना. दिवसभर या साडीत असून मला कमालीचं comfortable वाटत होतं. कधी एकदाची साडी फेडून tshirt आणि pant घालतेय असं जरा ही झालं नाही. Airport वरच्या त्या ३ तासात, flight मधल्या एक दीड तासात आणि मुंबईत उतरल्यावर घरी पोचेपर्यंत रिक्षाने केलेल्या प्रवासात काहीच अडचण जाणवली नाही. बरं आयुष्यात पहिल्यांदा मी असा साडीत प्रवास केला हां आणि वाटलं किती comfortable आहे साडीत प्रवास करणं. खरंच! Correct fitting चा blouse ज्यात कचकच होणार नाही आणि थोडी सैल साडी नेसण्याची सवय असायला हवी फक्त! बस, झालाच तुम्ही तुमच्या जीवनाच्या ‘साडीत AirPort look flaunt करणाऱ्या कंगना रनौत!’.
तर या थोडं cotton थोडं silk कल्याणी पट्टूच्या साड्यांचे रंग छान असतात. बरं दिसायलाही थोड्या Royal, नेसायला सोप्प्या आणि यात वावरणं तर अतिशय comfortable. कमी दागिने कमी makeup. Still u look beautiful! ❤️
माझ्याकडे हा साडीप्रकार नव्हता पण आता pure cotton नंतर जर मला कुठल्या साडीत इतकं comfortable वाटलं असेल तर या साडीत!
Thank you @colour.affair मला ही साडी भेट दिल्याबद्दल. @snehaldongare ❤️
#kalyanipattu | Posted on 10/Jan/2026 14:17:58

Hemangi Kavi
Hemangi Kavi

Check out the latest gallery of Hemangi Kavi