Nikita Ghag Instagram – महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय !
महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीवर दाखवलेला ठाम विश्वास हा विकासाभिमुख धोरणे, कार्यक्षम प्रशासन आणि स्थानिक पातळीवरील सातत्यपूर्ण कामगिरीची पावती आहे. शहरांच्या पायाभूत सुविधा, सेवा-सुविधा आणि सुशासन यांना दिलेल्या प्राधान्यामुळे हा जनादेश अधिक अर्थपूर्ण ठरतो. सर्व नव-निवडीत नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
या यशात योगदान देणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि मतदारांचे मनापासून आभार ! लोकहित केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राच्या शहरी विकासाला नवी गती देण्याचा भाजपचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
#महानगरपालिका #निवडणूक #Elections2026 #BJP #भाजपा #NikitaGhag #NikitaGhagBJP #NikitaGhagOfficial #BJPLeader #BJPMaharashtra
#BJPMumbai #BJPNariShakti | Posted on 16/Jan/2026 20:34:46



