Shweta Shinde Instagram – अप्रतिम कलाकृती!
“क्रांतिज्योती“ अगदी नावाला साजेल असाच… मराठी शाळांचा विचार करायला लावणारा आणि आपल्या बालपणाच्या आठवणींची ज्योत सतत मनात तेवत ठेवायला लावणारा चित्रपट. आज मी माझ्या मैत्रिणींबरोबर हा चित्रपट पाहायला गेले होते त्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर मजा मस्ती कल्ला गप्पा आणि शाळेतल्या अनेक आठवणींनी ओंजळ ओथंबून भरून वाहत होती. मोठं, यशस्वी होत असताना आज पुन्हा एकदा दोन वेण्या घातलेली, वर्गातील बेंचवर बसलेली ती लहानगशी श्वेता भेटली. धकाधकीच्या आयुष्यात थोडसं थांबून जरास मागे वळून तिचं स्मित हास्य, ते निरागस दिवस पाहिल्याबद्दल डोळ्यांत टचकन पाणी देऊन गेली.
@kshiteejog , @hemantdhome21 … जिंकलंत यार तुम्ही, याहून अधिक काही बोलण्यास शब्दचं अपुरे पडतायत. @ameyzone @mostlysane @sidchandekar @sachinskhedekar @chinoosumeet @pushkarajchirputkar @harishdudhadeofficial @kadambarik13 भन्नाट, अप्रतिम कडक आणि निव्वळ प्रेम. | Posted on 08/Jan/2026 19:15:32
Check out the latest gallery of Shweta Shinde



