Spruha Joshi Instagram – आजूबाजूला प्रेम करणारी माणसं असली की वाढदिवस आपसूकच खास होतो. कालचा दिवस माझ्या आवडत्या माणसांसोबत निवांत साजरा झाला… व्हिडिओ फोटो आणि मेसेजेस मधून तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा मिळाल्या ह्याचा आनंद आहेच.
पण यंदा बऱ्याच वर्षांनंतर विनोद दादा बरोबर वाढदिवस साजरा करता आला. आदल्याच दिवशी त्याचा वाढदिवस होऊन गेला होता, पण काल एका लग्नाची तिसरी गोष्ट नंतर आम्ही एकत्र सेलिब्रेट केलं.
सगळ्यांना वैयक्तिक reply देणं शक्य नाही होत त्यासाठी माफ करा, पण तुमच्या शुभेच्छा पोहोचल्या आणि माझा दिवस आणखी सुंदर झाला. लोभ आहेच तो असाच वृद्धिंगत होत राहो…
#SpruhaJoshi #birthday #gratitudepost | Posted on 14/Oct/2025 19:30:16



