Soundarya Sharma

Soundarya Sharma Instagram – लोकमत ग्लोबल आयकॉन अवॉर्ड्सद्वारे महाराष्ट्रासह भारतभरातील मान्यवरांचा गौरव करण्याचा अभिमानास्पद क्षण इजिप्तमध्ये अनुभवला.

सीमा, भाषा आणि भूगोल यापलीकडे जाऊन यशाचा सन्मान करणे म्हणजे केवळ पुरस्कार नव्हे – तर आपली संस्कृती, मूल्ये आणि प्रतिभेची जागतिक पातळीवर पुनःस्थापना होय.

इतिहासाचे साक्षीदार असलेल्या पिरॅमिड्सची भूमी आणि नाईल नदीच्या साक्षीने सजलेल्या कैरो (इजिप्त) शहरात आयोजित ‘लोकमत वन वर्ल्ड समिट अँड अवॉर्ड्स २०२६’ मध्ये भारताच्या उत्कृष्टतेला जागतिक मंच लाभला.
या समिटच्या यशस्वी आयोजनात कैरो येथील भारतीय दूतावासाने वेळोवेळी मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य केले, याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.

मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळा अधिक प्रतिष्ठित झाला:
* सी. सुषमा – डेप्युटी चीफ ऑफ मिशन व चार्ज द’अफेअर्स, भारतीय दूतावास

* अमृता फडणवीस – बँकर, पार्श्वगायिका, समाजसेविका व लोकहितकर्ता

* बोमन इराणी – प्रख्यात अभिनेते

* गोविंद गोयल – एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, कालिका स्टील अलॉयज प्रा. लि.

* मोहम्मद अबू बाशा – व्हाइस चेअरमन, MABA व चेअरमन, Egyptian Junior Business Association

* सौंदर्या शर्मा – प्रख्यात अभिनेत्री

* सौरभ अथावले – डायरेक्टर, KCyber Experts प्रा. लि.
आज इजिप्तच्या भूमीतून आम्ही जगाला एकच संदेश देत आहोत…
एक जग-एक दृष्टी-एक भविष्य.
#Lokmat #OneWorldSummit #India #Egypt #Global OneWorldOneVision MediaBeyondBorders Maharashtra | Posted on 10/Feb/2026 13:27:14

Soundarya Sharma
Soundarya Sharma

Check out the latest gallery of Soundarya Sharma