Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 01/Jul/2021 10:15:02

Navaneet Kaur Instagram –
Navaneet Kaur Instagram – चिखलदरा स्काय वॉक लवकरच पूर्ण होणार
जगातील तिसऱ्या व भारतातील पहिल्या चिखलदरा स्कायवॉक संदर्भात उच्चस्तरीय बैठकीत खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी सर्व तांत्रिक अडचणी समजून घेतल्या,केंद्रीय वनविभाग,पर्यावरण विभाग,सिडको यांच्या अधिकाऱ्यांसोबत नागपूर येथील नवीन सचिवालयात आयोजित बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होऊन चिखलदरा स्कायवॉक पूर्णत्वास जाण्यासाठी त्रुटी दूर करून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून 2 महिन्याचे आत रखडलेले काम मार्गी लावण्याचे खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे निर्देश
महाराष्ट्र शासनाच्या हलगर्जीपणा मुळे व कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट न देता,परवानगी साठी आवश्यक कागदपत्रे न दिल्याने व उदासीन वृत्तीमुळे सदर स्कायवॉकचे काम रखडले 
मेळघाटच्या विकासात राजकारण न करता सर्वानी सहकार्य करण्याचे खासदार सौ नवनीत राणा यांचे आवाहन
नागपूर–चिखलदरा स्कायवॉक या मागील राज्य सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंजूर करून  निधी वितरित केलेला अत्यंत महत्वाच्या प्रकल्पाचे चे काम  राज्यशासनाद्वारे दुर्लक्षित काही  तांत्रिक अडचणीमुळे रखडले आहे.
 मेळघाट कन्या खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी आज सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेतली. 
 या बैठकीत भारत सरकारचे डीडीजीएफ श्री व्ही एन अंबाडे,महाराष्ट्र शासनाचे नोडल अधिकारी श्री नरेश झुरमुरे,वन्यजीव विभागाचे सीएफ श्री युवराज, केंद्र शासनाचे तांत्रिक अधिकारी श्री एन के डेमरी,मेळघाट च्या डिसीएफ पियुशा जगताप मॅडम,सिडको चे कार्यकारी अभियंता श्री देवेंद्र जामनेकर, सह अभियंता श्री अमोल निमसळकर,भारत सरकारचे एआयजी श्री सी.बी.तहसिलदार आदी वरिष्ठ अधिकारी,युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने,सुधा तिवारी आदी उपस्थित होते.
 यावेळी या स्कायवॉक च्या संदर्भात वनविभाग व वन्यजीव विभाग तसेच पर्यावरण विभागाने ज्या त्रुटींच्या आधारे सदर स्काय वॉक  चे काम रोखले होते,त्यावर चर्चा करण्यात आली व पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन  करण्यात आले व यात खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी विभागाने याचे सविस्तर अध्ययन करून प्रत्यक्ष स्थळपाहणी करून वस्तुस्थितीच्या आधारे निर्णय घ्यावा व मेळघाटच्या सर्वांगीण विकासासाठी या प्रकल्पाला तात्काळ पूर्णतेकडे नेण्यासाठी सहकार्य करावे असे  निर्देश दिले.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur