Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 07/Aug/2021 13:47:14

Navaneet Kaur Instagram – कोरोना लॉकडाऊन काळात रोजगार नसल्याने विद्यर्थ्यांनी घेतलेल्या शैक्षणिक कर्ज वसुलीला 3 वर्ष स्थगिती द्यावी व कोरोना काळातील व्याज माफ करावे,खासदार सौ नवनीत रवी राणा यांची  केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचेकडे आग्रही मागणी
 अमरावती जिल्ह्याच्या विकासाला पूरक असणारा व किमान 1000 लोकांना रोजगार देणारा भारत डायनॅमिक्स या संरक्षण क्षेत्रातील उद्योगाला अर्थसंकल्पीय तरतूद करून चालना द्यावी-खासदार सौ नवनीत रवी राणा
 मेळघाट सारख्या  अतिदुर्गम आदिवासीबहुल भागातील चुरणी,धारणी व चिखलदरा  येथे राष्ट्रीयकृत बँकेची अतिरिक्त शाखा देऊन आदिवासींना जलद-सुलभ बँकिंग व्यवस्थेचा लाभ मिळावा
 जिल्ह्यातील शेतकरी-शेतमजुरांना विविध शासकीय योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान व वित्तीय सहायता यासाठी बँकांनी सुलभ प्रक्रिया राबवावी,कर्मचाऱ्यांची अरेरावी व अडेलतट्टू धोरण यामुळे गोरगरिबांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो व चकरा माराव्या लागतात -खासदार सौ नवनीत रवी  राणा यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे तक्रार
नवी दिल्ली-जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव धडपड करणाऱ्या व केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लाभ आपल्या अमरावती जिल्ह्याला मिळावा यासाठी दिल्ली येथे अविरत प्रयत्न करणाऱ्या खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
 कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून अर्थचक्र मंदावले आहे व त्याचा परिणाम रोजगार निर्मितीवर झाला आहे ज्यामुळे शैक्षणिक कर्ज घेऊन आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यर्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.रोजगार नाही पण बँकेचे शैक्षणिक कर्ज व त्यावरील व्याज मात्र डोक्यावर आहे यामुळे विदयार्थी चिंतातुर आहेत,अश्या होतकरू व प्रामाणिक विद्यर्थ्यांच्या हितासाठी कोरोनाकाळातील व्याज संपूर्णपणे माफ करावे व त्यांच्या शैक्षणिक कर्जवसुलीस किमान पुढील 3 वर्ष स्थगिती द्यावी अशी आग्रही मागणी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली.
 अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी बहुल भागात नागरिकांना बँकेच्या छोट्या छोट्या कामासाठी दिवसभर ताटकळत बसावे लागते परिणामी त्यांचा रोजगार बुडतो व त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो,म्हणून या भागातील चुरणी,धारणी व चिखलदरा येथे राष्ट्रीयकृत बँकेच्या अतिरिक्त शाखा देऊन तेथील कर्मचारी संख्या वाढवावी अशी मागणी सुद्धा खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी यावेळी केली.
Navaneet Kaur Instagram –

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur