Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 01/Aug/2021 14:26:27

Navaneet Kaur Instagram – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ सौ भारती पवार यांचे खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांचेकडून अभिनंदन व जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारणाबाबत प्रदीर्घ चर्चा
 अमरावती मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करावे -खासदार सौ नवनीत रवी राणा यांची मागणी
 मेळघाटातील कुपोषण दूर करून आरोग्य यंत्रणा सक्षमतेने  सुधारण्यासाठी विशेष आराखडा तयार करणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची खासदार सौ नवनीत रवी राणा यांना माहिती
कोरोना काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करणार,यात सहभागी असणारयांची गय करणार नाही,आरोग्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
मेळघाटच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी नागरिकांच्या आरोग्यविषयक सुविधांसाठी मेळघाट मध्ये मोबाईल हॉस्पिटल्स सुरु करावे,मेळघाट मध्ये सर्वसुविधायुक्त रुग्णवाहिका द्याव्या,तिवसा,चांदुर बाजार,अचलपूर-परतवाडा, अंजनगाव सुर्जी,दर्यापूर,धारणी, चिखलदरा,भातकुली आदी तालुक्यामधील आरोग्य यंत्रणेचे ऑडिट करून त्या ठिकाणी असणाऱ्या कमतरता दूर करून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसुविधा अल्पदरात व विनाविलंब  मिळाव्या  यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी जिल्ह्याचा दौरा करून पाहणी करावी अशी मागणी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केली असता आपण लवकरच अमरावतीत येऊन आरोग्यव्यस्थेचा आढावा घेऊ असे वचन डॉ भारती पवार यांनी दिले.
 कोरोना काळात आरोग्य यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगनमत करून शासकिय निधीचा गैररव्यवहार केला असल्याचे आमदार रवी राणा यांनी डॉ भारती  पवार यांच्या लक्षात आणून दिले असता त्यांनी आपण यात जातीने लक्ष घालून याची सखोल चौकशी करू व दोषींवर कठोर कार्यवाही करू असे अभिवचन दिले.
 खासदार सौ.नवनीत रवी राणा यांच्या प्रयत्नांमुळे अमरावती 
जिल्ह्यातील आरोग्यसुविधांचा दर्जा सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत.या भेटीचे वेळी युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने उपस्थित होते.
Navaneet Kaur Instagram – नवनियुक्त केंद्रीय पंचायत राज मंत्री श्री कपिल पाटील यांची भेट घेऊन खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केले अभिनंदन
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती स्मार्ट आणि डिजिटल करून अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी केली निधीची मागणी
पंचायत राज प्रणाली सक्षम करून ग्रामपंचायत मार्फत शेवटच्या घटकाला न्याय मिळावा यासाठी पंधराव्या वित्त आयोग निधी वाढवून देण्याची मागणी
 जिल्हा परिषद-पंचायत समिती-ग्रामपंचायत या त्रिसूत्रीचा प्रभावीपणे व पारदर्शक पद्धतीने समन्वय साधून ग्रामस्तरावर नाविन्यपूर्ण विकासाच्या योजना राबवाव्यात, केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासीना विशेष योजना राबवून सक्षम करावे -खासदार सौ नवनीत रवी राणा यांचा श्री कपिल पाटील यांना आग्रह 
अमरावती भेटीचे दिले निमंत्रण

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur