Spruha Joshi Instagram – गेले काही दिवस ‘सूर नवा’च्या मंचावरून जो सांगितिक उपक्रम सुरू आहे, तो आपण सगळे बघताच आहात. आमच्या या नवीन, उमद्या गायकांना त्यांचं स्वतःचं नवीन कोरं गाणं मिळतंय. ही त्यांच्यासाठी गायक म्हणून अप्रतिम संधी आहे. आणि रसिक म्हणून आपल्याला पर्वणी. असा उपक्रम याआधी कोणत्याच रिअॅलिटी शो मध्ये झालेला नाही..
म्हणून या उपक्रमात आपलाही लहानसा सहभाग असावा असं वाटलं, आणि मी अवधूतकडे ही इच्छा बोलून दाखवली. त्याने त्वरित माझा हट्ट मान्य केला आणि माझ्या लाडक्या वैशाली सामंत सोबत मी हे गाणं करावं असं मला सांगितलं. गेल्या आठवड्यात उत्कर्ष राजगायक झाला आणि मी आणि वैशाली लगेच कामाला लागलो. उत्कर्ष चा आवाज आणि वय हे दोन्ही लक्षात घेऊन वैशाली ने जी कल्पना सांगितली ती मस्त होती फार. ‘तरुण पिढीला त्यांचा महाराष्ट्र भविष्यात कसा हवा आहे, त्यांच्या आशा आणि स्वप्नं मांडणारं गाणं आपण करूया’ असं तिने सुचवलं. मला तिच्या डोक्यातली चालही गुणगुणून दाखवली. मला कल्पना तर बेहद्द आवडलीच पण इतक्या clear brief नंतर माझं काम खूप सोप्पं होऊन गेलं. अजून पूर्णसुद्धा न झालेली कविता उत्कर्षच्या आवाजात ऐकू येऊ लागली. रात्री दीड दोन वाजेपर्यंत गाणं पूर्ण लिहून झालं. या सगळ्या प्रोसेसमध्ये वैशाली खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. अवधूत – गिरीजा दोघांनीही कौतुकाची थाप दिली.
प्रत्यक्ष गाणं अनुराग ने सुंदर arrange केलं आणि उत्कर्षने अक्षरश: या गाण्याचं सोनं केलं. हे त्याचं पहिलं गाणं आहे, हे कुणालाही खरं वाटणार नाही . इतक्या सहजतेने आणि सफाईने तो गायलाय.
पण खरी जादू आहे ही ती त्याच्या स्वप्नाळू वयाची आणि त्या निरागस सुरांची. त्यात विश्वास आहे, ठामपणा आहे, ताकद आहे आणि आत्मविश्वासातून आलेला शांतपणा आहे. त्याच्या आवाजात हे गाणं ऐकताना ‘भविष्य सुंदर असणार आहे, ही खात्री मला वाटली, तशी तुम्हालाही वाटणार यात कोणतीही शंका नाही.
आणि दरवेळेस मला एकाहून एक सुंदर अनुभव देऊ करणाऱ्या ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या मंचाबद्दल काय लिहू ? या संपूर्ण टीमला अनेक अनेक वेळा thank you. आणि फक्त आणि फक्त प्रेम …!!.❤️
स्पृहा.
Full Song Link In Bio
@colorsmarathi @avadhoot_gupte @maheshmkale @vaishalisamant @utkarsh_wankhede_official @vaibhavjosheeofficial @mithileshpatankar @ajitparab75 @mandarwadkar9 @avibhan22 @the.prathmesh.desai @varadflute_official @amit_pianojazz @odevaskar @manishbassman @kishorguitar @prasadpadhye Mumbai, Maharashtra | Posted on 29/Aug/2022 09:31:43



