Hemangi Kavi Instagram – काल नितीन देसाई गेल्याची बातमी ऐकल्यापासून त्यांनी निर्माण केले भव्या दिव्य sets डोळ्यासमोर येत राहीले कुठल्या कुठल्या सिनेमातले आणि कानात एकच गाणं ऐकू येत होतं. त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या ‘अजिंठा’ सिनेमातलं…
‘मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले’
का कुणास ठाऊक? रात्री याच गाण्यातली पावसाळी दृश्य पापण्यांवर तरळत राहीली आणि ओळी ऐकू येत राहील्या. अगदी झोप लागेपर्यंत! सकाळी उठले आणि कळलं आज ‘ना.धो. महानोर’ गेले!
काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ती अशी!
आज दिवसभर जैत रे जैत, एक होता विदूषक, मुक्ता, सर्जा मधली गाणी कानात घुमत राहतील!
“काल्या एकल्या राती मन मोडून जाती
असं एखादं पाखरू वेल्ल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळं”
अलविदा, रानकवी!
#नाधोंमहानोर #रानकवी #NaDhoMahanor #नामदेवधोंडोमहानोर महाराष्ट्र | Posted on 03/Aug/2023 12:40:46



