Spruha Joshi

Spruha Joshi Instagram – थोडी थकलेली माती
विरणारी काही पाने,
मी पुन्हा तरी उमलावे
एका हसऱ्या स्पर्शाने..

ओंजळ भरल्या पाण्याने
मातीस कळावे गूज,
वाऱ्याने फुंकर देता
इवल्या रोपा ये नीज..

आतून करपले मूळ
तग पुन्हा नव्याने धरते,
या जगामध्ये असण्याची
मग आस पुन्हा पालवते..

– स्पृहा

(अपूर्ण… 🌿🍃🪴)

Inspired by @inkologyart | Posted on 23/Jun/2024 21:01:23

Spruha Joshi
Spruha Joshi

Check out the latest gallery of Spruha Joshi