Smita Shewale Instagram – या रविवारी ‘तो बहिर्जी होता’हा प्रयोग बघायला मी गेले होते. शिवराज अष्टका मध्ये दिगपाल बहिर्जी नाईक यांची भूमिका करतो.माझा अतिशय जवळचा आणि लाडका मित्र आहे म्हणून त्याचं कौतुक वाटत नाही तर तेवढा तो हुशार आणि गुणी अभिनेता आहे. दिग्दर्शक किती चांगला आहे हे सांगायची गरजच नाही. परंतु हा प्रयोग ज्या पद्धतीने रंगतो त्यांचं अभिवाचन हे वाचनापुरतं मर्यादित राहत नाही तर संपूर्ण त्या काळचा कालखंड उभा करण्याची ताकद या संपूर्ण संहिते मध्ये आहे. याबद्दल ॲड.आनंद देशपांडे यांचे खूप कौतुक.अक्षरशः अंगावर काटे येत होते. भरभरून टाळ्या वाजवाव्याशा वाटत होत्या. सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत जयघोष होत होता. अवधूत गांधी यांचं गाणं प्रत्यक्ष ऐकायला मिळणं म्हणजे पर्वणीच.हा संपुर्ण अनुभव घेण्यासाठी सगळ्यांनी एकदा तरी ‘तो बहिर्जी होता ‘ हे नाट्यरूप अभिवाचन बघावं. या संपूर्ण टीमला माझ्याकडून पुढच्या प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा. | Posted on 12/Nov/2024 12:10:27
Check out the latest gallery of Smita Shewale



