Smita Shewale Instagram – तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. त्याशिवाय सुख नाही.
-पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ
आज सन्मती बाल निकेतन मांजरी येथे खास ममता ताईला भेटायला गेले. नेहमीसारखंच इतकं कौतुकाने आणि प्रेमाने स्वागत केल. मला आता ते दुसरं घर वाटू लागलं आहे. माईंनी समाजासाठी जे काही केलंय त्याचा वारसा पुढे घेऊन जाण ही आपली जबाबदारी आहे. माईंचा आज जन्म दिन.. माई तुम्ही दिलेली शिकवण कायम स्मरणात राहील. | Posted on 14/Nov/2024 21:44:32



