Resham Tipnis

Resham Tipnis Instagram – मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटक
” वस्त्रहरण ”
शुभारंभाचा प्रयोग – श्री शिवाजी मंदिर, दादर
१६ फेब्रुवारी १९८० – १६ फेब्रुवारी २०२५
नाबाद ४५ वर्ष

कोकणात सामान्य घरात जन्मलेल्या श्री. मच्छिंद्र कांबळी यांनी १६ फेब्रुवारी १९८० रोजी श्री शिवाजी मंदिर येथे ” वस्त्रहरण “चा शुभारंभ केला.
प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी हे गुण अंगी असलेल्या बाबूजींनी मराठी रंगभूमीवर मालवणी बोलीभाषेचे नवे दालन उघडले. प्रयोगागणिक
” वस्त्रहरण ” चे गारूड मराठी रसिक मनावर होत गेले.
नाटकाच्या १७५ व्या प्रयोगाला ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी नाटक बघून एक पत्र लिहिले त्यात ते असं म्हणाले की, ” असा १००% देशी फार्स मी गेल्या कित्येक वर्षात पाहिला नव्हता….या नाटकात मला काम करायला मिळालं असतं तर मी स्वतःला भाग्यवान समजलो असतो.” या शब्दात कौतुक केले. नंतर या नाटकाने मागे वळून बघितले नाही आणि मराठी रंगभूमीवर विक्रमी प्रयोग केले.
४५ वर्षांनी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे ‘ वस्त्रहरण ‘चा प्रयोग क्र. ५३०८ सादर होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायला नक्की या….

● रविवार १६ फेब्रुवारी दु. ३.३० वा. श्री शिवाजी मंदिर, दादर.

काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.

Ticket booking link
https://in.bookmyshow.com/plays/vastraharan/ET00394866

( Theatre, Play, performance, drama, Musical, Marathi drama, stage show )

#Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #mumbai #dadar | Posted on 28/Jan/2025 10:27:30

Resham Tipnis
Resham Tipnis

Check out the latest gallery of Resham Tipnis