Mukta Barve Instagram – छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्याचे थोर सरदार आणि नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी राजे भोसले यांची शौर्याची, अभिमानाची, मराठ्यांच्या वैभवाची ओळख असलेली तलवार… अधिकृतरित्या लंडनहून परत आपल्या मातीत येत आहे!
ही तलवार महाराष्ट्र सरकारने लिलावातून जिंकली असून आपला ऐतिहासिक वारसा मायदेशी परतत आहे.
हा अभिमानाचा क्षण शक्य केल्याबद्दल माननीय माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र सरकारचं मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार!
#raghujirajebhosle #itihaaas #maharashtra #parampara #marathi #abhiman #maharshtrashasan #ashishshelar #muktabarve #beyondmukta #vaibhavshali | Posted on 16/Aug/2025 21:26:53



