Mukta Barve Instagram – प्रिय रसिकहो,
दिनांक 3 ऑक्टोबर रोजी ‘ प्रिय भाई एक कविता हवी आहे…’ चा प्रयोग आम्ही स्वतंत्र रित्या आयोजित केला होता, परंतू, ती तारीख महानगरपालिकेची होती हे नंतर कळले.
महानगरपालिकेने, मराठी भाषेचे संवर्धन व्हावे अणि ती वृद्धिंगत व्हावी यासाठी दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आखले आहेत.
आता, सुदैवाची गोष्ट म्हणजे, या कार्यक्रमांतर्गत ‘ प्रिय भाई एक कविता हवी आहे ‘ हे संगीत-चित्र-नाट्य अभिवाचन त्याच दिवशी- वेळी- ठिकाणी, म्हणजे दिनांक 3 ऑक्टोबर रोजी, बालगंधर्व रंगमंदिरात रात्री 9.30 वाजता, सादर होणार आहे.
*ज्या रसिकांनी book my show वरुन तिकिटे काढली आहेत त्यांना पैशांचा refund मिळेल अणि त्यांना हा कार्यक्रम विनामूल्य पाहता येईल. मात्र, बसण्याची व्यवस्था, प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य या स्वरूपाची आहे.*
विशेष म्हणजे हा प्रयोग विनामूल्य आहे, त्यामुळे जास्तीत जास्त रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा !! 🙏🏻🙏🏻 | Posted on 30/Sep/2025 13:39:05



