Mukta Barve

Mukta Barve Instagram – एक सुंदर सिनेमा बघितला ‘साबर बोंडं’ .
लेखक-दिग्दर्शक रोहन कानवडे, त्याची सगळी टीम,म्हणजे पदद्या वरचे -मागचे सगळे कलाकार , हा सुखद अनुभव दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
कोणताही अभिनिवेष नसलेला, गणित मांडून चौकटीत न बसवलेला हा सिनेमा. मला अगदी नकळत , अलगद ,थेट सिनेमाच्या आतल्या जगात घेऊन गेला ,पडद्यावर कोणी अभिनय करतंय असं वाटतंच नव्हतं . थिएटर मध्ये बसून मला गोष्टीतल्या हवेतला गारवा जाणवला, नदीच्या पाण्याचा थंडपणा अंगात शिरला, उन्हाचा चटका लागला, अनवाणी चालताना काटाही रुतला आणि मी खऱ्या आयुष्यात कधीच न चाखलेल्या साबर बोंडा ची चवही तृप्त करून गेली.
@jayshriuj जयश्री माझी जवळची लाडकी मैत्रीण, ती दोन तास मला ‘आनंद ची आई’ च वाटली. जयू तुझं खूप कौतुक आणि प्रेम.
असं आतून आलेलं, चांगलं काम आपल्या भाषेत होताना बघितलं की अभिमानानी मन भरून येतं, अमूर्त वाटणाऱ्या चांगल्या कल्पना नक्की सत्यात उतरतील अशी खात्री वाटते, चांगलं काहीतरी करण्यचा हुरूप येतो.
मोठ्या पडद्यावर एक सकस अनुभव घेण्यासाठी ‘ साबर बोंडं’ नक्की बघा. | Posted on 21/Sep/2025 19:06:30

Mukta Barve
Mukta Barve

Check out the latest gallery of Mukta Barve