Hemangi Kavi

Hemangi Kavi Instagram – आपली सर्वात आवडची गोष्ट भेट म्हणून एखाद्याला द्यावी तेही कुठल्याही मोबदल्याशिवाय… याला मोठं मन लागतं आणि ती भेट जर साडी असेल तर मग काय बोलायलाच नको.
बाईसाठी साडी म्हणजे जीव की प्राण आणि ती “माझ्यापेक्षा तुम्हांला छान दिसेल ताई” म्हणून देऊन टाकायला काळीज लागतं. ही साडी माझ्या वहीनीने म्हणजे गावच्या चुलत भावाच्या बायकोने मला दिलीए. एवढीच अपेक्षा छान blouse शिऊन साडी नेसलेला मला एक photo पाठवा बस! आता ही नवी कोरी साडी, बरं आमच्या साताऱ्यात किंवा एकंदर पश्चिम महाराष्ट्रात किनै ‘नविन साडीची घडी मोडणे’ याला असाधारण महत्व आहे. ती कोण, कधी, कुठे मोडतेय याला पण तितकंच महत्व असतं. आता ते का हा एक संशोधनाचा विषय आहे तो नंतर कधीतरी तुर्तास या साडीबद्दल सांगते. तर नवी कोरी साडी मला वैनीने (☺️) दिली, “कुठल्यातरी कार्यक्रमाला नेसा” सांगून. माझ्या या वैनीच्या हाताला भारी चव. दगडाची भाजी केली ना तर ती ही चविष्ट होईल इतकी. मी गावाला गेले की हीच्याच हातचं जेवते किंवा जेवावं लागतं म्हणावं लागेल. शेतात काम करते, स्वतः बनवलेले जेवणाचे tiffins पुरवते. परिस्थिती बेताचीच पण साडी देणे असो किंवा मग आवडीने जेवण खाऊ घालणे असो हे असं सगळं करायची माणसात दानत असावी लागते आणि ती तिच्यात आहे.
परवा अकोल्याला एका शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होता, तिथं नेसले ही साडी!
बरं आमच्या serial च्या set वर जेव्हा मी अशा अशा कार्यक्रमाला चाललेय सांगितलं तेव्हा लगेच माझ्या serial मधली लेक अमृता म्हणाली “ए ताई, मग माझं लक्ष्मी pendant चं मंगळसूत्र घालशील?” तिचा स्वतःचा brand आहे @amrutaarts_ म्हटलं चला दागिन्यांचा प्रश्न सुटला! किती सुंदर दिसतंय ते या साडीवर! Blouse आधीचाच घातला. कानात मोत्याचे लोबंते कानातले घातले आणि झाले मी कार्यक्रमाला तयार!

@amrutamalwadkar Thank u गं 😘

#sareelove #gift #love #grateful #lovelypeople | Posted on 01/Feb/2026 12:59:37

Hemangi Kavi
Hemangi Kavi

Check out the latest gallery of Hemangi Kavi