Hemangi Kavi Instagram – काल सकाळी मी नेहमीप्रमाणे shooting ला गेले. Make up करून, तयार होऊन script वाचनाला आम्ही सगळे जमलो. Scene वाचायला सुरवात करणार तेवढ्यात आमच्या दिग्दर्शक जयंत पवारांच्या फोन वाजला. पाहीलं तर त्यांच्या आईंचा फोन आला. आमचे दिग्दर्शक म्हणाले मी breakfast केला का विचारायला फोन केला असेल हां आता आईने आणि हसत हसत आमच्यासमोरच call घेतला. ते हॅलो बोलणार इतक्यात ते म्हणाले ‘काय?’. आमच्या सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. तिथून त्यांनी काय ऐकलं आम्हांला काहीच कळेना. अगदी थोड्या वेळात त्यांनी फोन ठेवला आणि आम्हांला सांगितलं, “अजित पवार गेले”. आम्ही गोंधळून सगळ्यांनी एकदम विचारलं, “काय, कोण गेलं?”. तर ते हताशपणे म्हणाले “अजितदादा पवार”. हे ऐकल्यावर आम्हांला जो धक्का बसला तो मी इथं शब्दात सांगूच शकत नाही. आम्ही पटापट आमचे आमचे फोन उघडून social media पाहू लागलो कारण आम्ही जे ऐकलं त्यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. वाटत होतं काहीतरी चुकीचं ऐकलं किंवा काहीतरी नावाचा गोंधळ झालेला असेल? Fake news असेल पण सगळ्या social media वर अजितदादांच्या मृत्यूच्या बातम्या दिसू लागल्या.
धक्कादायक म्हणजे काय हे काल पुन्हा प्रकर्षाने जाणवलं. आज हे सगळं लिहिताना सुद्धा मला नीट process झालेलं नाहीये.
१० वर्षांपूर्वीची गोष्ट मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे अजितदादांसोबत इतर नेते सुद्धा आले होते.
Continue in comments!
#ajitpawar #अजितपवार | Posted on 29/Jan/2026 12:50:06
Check out the latest gallery of Hemangi Kavi


