सीमा सुरक्षा दलात कार्यरत इंदोर येथे कर्तव्यावर असतांना शहीद झालेल्या प्रवीण सुरेशराव सातारकर यांचे छागानी नगर रवी नगर निवासस्थानी जाऊन सौ नवनीत रवी राणा यांनी केले सातारकर कुटुंबियांचे सांत्वन,प्रवीण सारख्या धाडसी व होतकरू व्यक्तिमत्त्व असे हृदयविकाराच्या आघाताने आकस्मिकपणे निघून जाणे अत्यंत वेदनादायी-खासदार सौ नवनीत रवी राणा यांची श्रद्धांजली
अमरावती-अमरावती येथील छागाणी नगर-रवी नगर निवासी प्रवीण सुरेशराव सातारकर हे भारतीय सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. अत्यंत मनमिळावू,सर्वांच्या मदतीस सदैव तत्पर अशी त्यांची परिसरात ख्याती होती.इंदोर मध्यप्रदेश येथे कर्तव्यावर असतांना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे आकस्मिक निधन झाले,ऐन तारुण्यात आपला कर्ता तरुण व्यक्ती गमवावा लागल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा पहाड कोसळला.
खासदार सौ नवनीत राणा यांना हे वृत्त कळताच त्यांनी तातडीने त्यांचे निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.आपण सदैव या कुटुंबियांचे पाठीशी राहू असे त्यांनी सांगितले.त्यांचे पश्चात पत्नी,2 मुली,आई वडील असा आप्तपरिवार आहे.या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना करून खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी कुठल्याही वेळी आपण मला हाक द्या मी आपल्या सेवेत तत्पर राहील असे अभिवचन या कुटुंबियांना दिले.
यावेळी सातारकर कुटुंबीय,नगरसेविका सुमती ढोके,पराग चिमोटे,विनोद गुहे,नाना सावरकर,भूषण पाटणे, कमलकिशोर मालानी,दिनेश काजे,अनिल शुक्ला,शुभम उंबरकर,अंकुश सावळे यांचेसह परिसरातील शोकाकुल नागरिक उपस्थित होते.
Thank you Hon. Prime Minister Sir
श्री राम नवमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा।
कोरोनाच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील संयुक्त पूर्व परीक्षा संदर्भात योग्य धोरण निश्चित करून लवकर निर्णय घ्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांना तयारी करता येईल व संभ्रम दूर होईल. आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांची राज्यपाल श्री भगतसिंग कोशारी यांचेकडे मागणी
परवडणाऱ्या घरांचे वितरण,अल्प,मध्यम उत्पन्न गटातील गरजूंना मिळाल्या स्वतःच्या हक्काच्या घराच्या चाब्या, मालकी हक्काचे घरकुल मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद,खासदार म्हणून आपण केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळे, अनेकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर मिळाल्यामुळे मनस्वी आंनद झाला,, या विशाल प्रकल्पाला यशस्वी करणारी यंत्रणा मनपा,म्हाडा, तंत्रज्ञ,संबंधित कंत्राटदार,अधिकारी कर्मचारी,कुशल-अकुशल कामगार यांचे आभार मानले व लाभार्थ्यांचे अभिनंदन केले