Mukta Barve Instagram – काल मला राज्य शासनाचा अत्यंत मानाचा , आपुलकीचा , कौतुक करणारा
चित्रपती कै. व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मिळाला. मी आत्तापर्यंत केलेल्या कामाचं राज्यशासनानी केलेलं हे कौतुक. या साठी मी केवळ कृतज्ञ आहे. मला कामाची संधी देणऱ्या प्रत्येक लेखक, दिग्दर्शक, निर्माता, ज्यांच्या बरोबर काम करता आलं ते सहकलाकार, मला घडवणारे शिक्षक आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणारे माझे मित्र, हितचिंतक आणि प्रेक्षक यांच्या प्रति मी कृतज्ञ आहे.
मी पुरस्कार स्वीकारतना आई च्या डोळ्यातले आनंदाश्रू बघुन वाटलं ‘याच साठी केला होता अट्टहास ‘
( हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत ज्यांच्यामुळे आला त्या @vaibhavshetkar आणि @pranavbhadarge यांना खूप खूप मनापासून Thanks. त्याबद्दल पुढच्या पोस्टमधे सांगेनच) | Posted on 06/Aug/2025 20:57:20
Check out the latest gallery of Mukta Barve



