Namrata Sambherao

Namrata Sambherao Instagram – महाराष्ट्रात आलेल्या महापुरात शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालय ….ऐन दिवाळीच्या उंबरठ्यावर लोकांची संसार उध्वस्त झालीत …..
आमच्या ‘थेट तुमच्या घरातून” ह्या नाटकाची जबाबदारी म्हणून
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील ‘आटाळा’ आणि ‘रोशनगाव’ ही दोन गाव आम्ही मदतीसाठी निवडली ….

40 लाभार्थी प्रती गाव याप्रमाणे दोन्ही गावांत 80 लाभार्थी आहेत ज्यांना आमच्या नाटकाच्या ‘शंभराव्या प्रयोगच्या निमित्ताने’ तांदूळ , डाळ, तेल, साखर, मीठ ,चण्याचं पीठ आणि इतर गोष्टी अस धान्याचे ‘शंभर’ किट्स च वाटप आम्ही या गावात करतोय … सदर मदत कार्यात जबाबदारी ची जाणीव म्हणून आमच्या ‘थेट तुमच्या घरातुन’ ह्या नाटकाच्या टीम तर्फे हा खारीचा वाटा आम्ही उचलतोय

‘स्वदिप सखी महिला सेवा सहकारी संस्था’
ह्या मदत करणाऱ्या संस्थेला शतकमहोत्सवी प्रयोगाच्या दिवशी प्रतिनिधिक स्वरूपात एक किट दिले बाकीचे त्यांना पाठवले आहेत ते बुधवारी त्या गावी घेऊन जाणार आहेत

सांगण्याचा उद्देश एवढाच की अजून ही तिथे मदतीची गरज आहे
ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया करावी

धन्यवाद | Posted on 14/Oct/2025 14:41:55

Namrata Sambherao
Namrata Sambherao

Check out the latest gallery of Namrata Sambherao